Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Rain : मुसळधार पावसानं झोडपलं, 250 मिमीहून अधिक पाऊस पडला, लोकल खोळंबली, विमानं वळवली अन् रस्त्यावर वाहतूक कोंडी,मुंबईकरांचे प्रचंड हाल
मुंबईतील विविध ठिकाणी बुधवारी सायंकाळी सहा तासांमध्ये 250 मिमी पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळं शहरात ठिकठिकाणी पाणी साचलं होतं, वाहतूक सेवेवर परिणाम देखील झाल्याचं पाहायला मिळालं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुसळधार पावसामुळं रेल्वे, लोकल सेवा आणि विमान वाहतुकीवर देखील परिणाम झाला. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारी 14 विमानं दुसऱ्या शहरातील विमानतळांकडे वळवण्यात आली.
भारतीय हवामान विभागानं मुंबई आणि ठाण्यासाठी सकाळी साडे आठपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. त्यानंतर दिवसभर मुंबई आणि ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट असेल.
मुंबई महापालिकेच्या स्वयंचलित हवामान केंद्राच्या माहितीनुसार सायंकाळी 4 ते रात्री 10 पर्यंत मुसळधार पावसानं हजेरी लावली. मानखुर्द येथे 276 मिमी, पवईला 274 मिमी, घाटकोपरला 259 मिमी, पश्चिम उपनगरांमध्ये जोगेश्वरीत 191 मिमी, मरोळला 176 मिमी पावसाची नोंद झाली.
कुर्ला, भांडूप, मुलूंड आणि अंधेरी येथील सबवे पाण्याखाली गेले होते. मुंबईतील पावसामुळं लोकल सेवेवर परिणाम झाल्यानं गाड्या उशिरानं धावत होत्या. यामुळं मुंबईकरांना त्रासाला सामोरं जावं लागलं.
मुंबईत झालेल्या पावसानं रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. रात्री 10 नंतर पावसानं उसंत घेतली.