Mumbai Rain Update : मुंबईत धो धो पाऊस, घरात-रस्त्यांवर पाणी, ट्रॅफिक जाम; लोकल सेवा ठप्प; शाळांनाही सुट्ट्या
Mumbai Rain Update : मुंबईत आज (दि.25) दुपारपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. लोकांच्या घरात आणि रस्त्यांवर पाणी साचलय. शिवाय पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईची जीवनवाहिनी असणारी लोकल सेवाही पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरम्यान, मुसळधार पाऊस कोसळत असल्याने उद्या मुंबई आणि ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर वेस्टमध्ये घरात पाणी शिरले आहे.
मागच्या दोन तासापासून मुसळधार पडणाऱ्या पावसाने विरार मधील रस्त्यावर नदीचे स्वरूप आले आहे. विरार पूर्व मानवेलपाडा, विवा जहांगिड, फुलपाडा नाका, दर्शन नगर, भोईर वाडी परिसरात मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी पाहायला मिळत आहे.
एपीएमसी मार्केटमध्येही पाणी साचले आहे. संध्याकाळनंतर पावसाचा जोर वाढल्याने एपीएमसी मार्केटमध्ये पाणी साचले दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि उपनगरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सकल भागात पाणी साचले आहे.
मुंबई झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाण्याने तुंडुंब भरुन वाहत आहेत. पवई जेवीएलआर रोड मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
अंधेरी कुर्ला रोडवर मरोळ पाईपलाईन परिसरात तीन ते चार फूट पाणी भरल्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मागील तीन तासापासून गाड्यांचा लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गाडीमध्ये पाणी भरल्यामुळे अंधेरी कुर्ला रोडवर मोठा संख्या मध्ये गाड्या रस्त्यावर बंद पडल्या आहेत.
धो धो पाऊस पडल्याने मुंबईची जीवन वाहिनी असलेली लोकलसेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे. रेल्वे स्टेशनवर नागरिकांची मोठी गर्दा पाहायला मिळत आहे.
मागील 3 तासापासून पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. या जोरदार पावसामुळे दहीसर हायवे भुयारी मार्गाखाली 3 ते 4 फूट पाणी भरला आहे.