In Pics | नाईट कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस रस्त्यावर, अनेक ठिकाणी नाकाबंदी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नाईट कर्फ्यूनंतर मुंबई पोलीस रस्त्यावर उतरले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत जमावबंदीचे पालन काटेकोरपण केलं जात आहे. काल रात्री मुबंईत ठिकठिकाणी पोलीस तैनात होते.
मुंबई पोलिसांकडून अनेक ठिकाणी रात्री नाकाबंदी करण्यात आली होती.
रात्री विनाकारण फिरणाऱ्यांवर तसेच रॅश ड्राईव्हिंग करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती.
तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांना घरी परतण्याचं आवाहन पोलिसांकडून केलं जात होते.
राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत ही जमावबंदी लागू आहे. 27 मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू होणारे हे निर्बंध 15 एप्रिलपर्यंत लागू असणार आहेत.