Sachin Vaze Arrested : ॲंटिलिया स्फोटक प्रकरण ते सचिन वाझेंची अटक... जाणून घ्या घटनाक्रम
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळली. नंतर या गाडीच्या मालकाचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत आढळून आला. हे प्रकरण मग विधानसभेत विरोधकांनी उचलून धरलं. यात नाव समोर आलं ते एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं. सचिन वाझे यांना काल रात्री उशीरा एनआयएकडून अटक करण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळली. नंतर या गाडीच्या मालकाचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत आढळून आला. हे प्रकरण मग विधानसभेत विरोधकांनी उचलून धरलं.
या प्रकरणात खळबळ उडाली ती मनसुख हिरण यांचा मृतदेह आढळल्यानंतर. हिरण यांचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत आढळला. या प्रकरणी महाराष्ट्र एटीएसने हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मनसुख यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या फिर्यादीवरुन हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला. ज्यावेळी एटीएसचं पथक मनसुख यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झालं होतं. त्यावेळी मनसुख यांची आत्महत्या नसून हत्या झाली असल्याचा आरोप हिरण यांच्या कुटुंबियांनी केला होता.
यात नाव समोर आलं ते एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं. सचिन वाझे यांना काल रात्री उशीरा एनआयएकडून अटक करण्यात आली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. मुकेश अंबानी यांच्यासारखे उद्योजक सुरक्षित नाहीत. त्यांच्या घराबाहेर आढळलेली जिलेटिनने भरलेली गाडी आणि संपूर्ण घटनाक्रम संशय निर्माण करणारा आहे. त्यामुळे तपास एनआयएकडे सोपवावा अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. सोबतच या प्रकरणात त्यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले होते.
या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले होते की, जिलेटीन कांड्या सापडल्याचा तपास सुरु आहे. आधी फाशी द्या मग तपास करा याला अर्थ नाही. ही सरकारची पद्धत नाही. अजून एक नवीन पद्धत आहे, टार्गेट करायचं आणि चारित्र्यहनन करायचं, हे आम्ही नाही करणार. एवढं झाल्यावरही मनसुख हिरण यांच्या मृत्यूची दखल आम्ही घेतली. सचिन वाझे म्हणजे, ओसामा बिन लादेन असं चित्र निर्माण केलं जातं आहे. पण जो सापडेल त्याला दया माया दाखवणार नाही. पुढे बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले होते की, मनसुख हिरण मृत्यूप्रकरण गांभीर्याने घेतलेलं आहे, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार; तर सचिन वाझे यांचा सध्या शिवसेनेशी कोणताही संबंध नाही.
मनसुख हिरण मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस आधिकारी सचिन वाझे यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करण्यात आली. वाझे यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करण्यात आली. वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात बदली करण्यात आली.
याप्रकरणी सचिन वाझे यांना काल अटक करण्यात आली आहे. रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी वाझे यांना अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. अटकेपूर्वी तब्बल 13 तास सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. सचिन वाझे काल सकाळी 11 वाजताच एनआयएच्या कार्यालयात हजर झाले होते, तेव्हापासून त्यांची चौकशी सुरु होती.