PHOTO : दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क; Mumbai Local च्या सुरक्षेत वाढ
चार दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सहा दहशतवाद्यांना अटक केली होती. या अटकेमुळे मुंबई आणि देशभरातील दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी जान मोहम्मद हा मुंबईतील धारावी येथे राहतो. यानंतर तपास यंत्रणा सक्रिय झाल्या.
झाकीर हुसेन शेख या आणखी एका दहशतवाद्याला जोगेश्वरी परिसरातून एटीएसने ताब्यात घेतल्याचं समजतंय.
झाकीर हुसेन शेख हा धारावीतील जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालीया याचा हॅन्डलर होता.
या दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर मुंबई लोकल असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांनी मुंबई लोकलची रेकी केली होती.
अशातच दहशतवाद्यांनी मुंबई लोकलमध्ये विषारी गॅसच्या सहाय्याने हल्ला करण्याची योजना आखल्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिला आहे. त्यामुळे मुंबई लोकल स्थानकांवरच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
गुप्तचर यंत्रणेच्या इशाऱ्यानंतर रेल्वे पोलिसांनी स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली असून प्रत्येक गोष्टीची तपासणी केली जात आहे.
काही महत्वाच्या रेल्वे स्थानकावरील एन्ट्री आणि एक्झिटच्या मुख्य मार्गाव्यतिरिक्त इतर सर्व रस्ते बंद केले आहेत.
महत्वाच्या स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांची आणि त्यांच्याकडील वस्तूंची तपासणी करण्यात येत आहे.
मुंबई लोकलमध्ये यापूर्वी सीरिअल बॉम्बस्फोट झाले आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांचा मुंबई लोकलची रेकी करण्यामागे नक्की काय हेतू होता? याबाबत तपासयंत्रणा आणखी तपास करत आहेत.