Siddharth Shukla : सिद्धार्थच्या निधनानं रश्मी देसाईला मोठा धक्का, जुने फोटो शेअर करत भावूक पोस्ट
Siddharth Shukla Death: अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. सिद्धार्थची मैत्रिण रश्मी देसाईनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरश्मी देसाईनं सिद्धार्थच्या निधनानंतर जुने फोटो शेअर केले आहेत. सोबतच भावूक पोस्ट लिहिली आहे.
सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाची बातमी कळताच रश्मी देसाई त्याच्या घरीही पोहोचली होती.
रश्मी देसाईनं लिहिलं आहे की, कधी कधी आयुष्य खूप गुंतागुंतीचं असतं. आज माझ्याकडे काहीही शब्द नाही व्यक्त होण्यासाठी. माझं हृदय तुटलं आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या आत्म्याला शांती लाभो.
सिद्धार्थ आणि रश्मीचं नातं खूप खास असं राहिलं होतं. दोघांची मैत्री आणि भांडणं नेहमीच चर्चेत राहिली. रश्मी देसाई आणि सिद्धार्थ शुक्ला यांनी दिल से दिल तक मालिकेत सोबत काम केलं होतं.
बिग बॉसच्या घरात या दोघांमध्ये अनेकदा वाद झाला. तिथं ते काही वेळा मस्ती करतानाही दिसून आले तर काही वेळा जोरदार वादही झाला.
सर्व फोटो रश्मी देसाईनं आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.