Mumbai Pav Bhaji: तुम्हाला मुंबईतील प्रसिद्ध आणि जुने पावभाजीवाले माहितेय का? वाचा सविस्तर माहिती एका क्लिकवर
भारतातली खवय्यांची शहरं आठवायची म्हटलं तर दिल्ली, लखनौ, इंदोर अशी शहरं डोळ्यापुढे येतात, इंदोरला तर स्ट्रीट फूडची राजधानी म्हणून संबोधलं जातं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण विचार केला तर लक्षात येतं की संपूर्ण देशातच काय जगभरात प्रचंड लोकप्रिय झालेले आणि स्ट्रीट फूडच्या कॅटेगिरीत मोडणारे जवळपास सगळेच पदार्थ खरं तर या मुंबईची जगाला देणगी आहे.
सर्वात लोकप्रिय पावभाजी असो, वडापाव असो किंवा दाबेली, खिमा पाव, भेलपुरीसारखे पदार्थ संपूर्ण देशातल्या रस्त्यांवरच्या स्टॉल्सची रौनक याच पदार्थांनी वाढवली आहे.
या पदार्थांचा जन्म कधी झाला, पहिल्यांदा या पदार्थाला जन्माला कुणी घातलं याबद्दल मतभेद असू शकतात. मात्र जन्म कुठे झाला यावर नक्कीच एकमत आहे. या सगळ्याच चमचमीत पण पोटभर जेवणाला पर्याय ठरु शकणाऱ्या पदार्थांचा जन्म मुंबईतच झाला यात वादच नाही.
पावभाजीइतकी लोकप्रियता खरोखर दुसऱ्या कुठल्याच पदार्थाला मिळालेली नाही.
मुंबईतली किंवा देशातलीच नव्हे तर जगातली पहिली पावभाजी तयार करण्याचा दावा दोन मुंबईकरांचा आहे.
मुंबईतले सर्वात जुने सरदार पाव भाजीवाला आणि कॅनन पावभाजीवाला आपापला दावा सादर करतात.
सरदार पावभाजी अर्थातच मुंबईतली सर्वात लोकप्रिय पावभाजी आहेत.
सीएसटी स्टेशनसमोरच्या कॅनन पावभाजीवाल्याचाही देशातला सर्वात जुना पावभाजीवाला असा दावा आहे.
कॅनन आणि सरदार दोन्हीची लोकप्रियता अजूनही जबरदस्त आहे. प्रत्येक शहराच्या प्रत्येक भागात एक फेमस पावभाजीवाला असणारच. प्रत्येक पावभाजीवाल्याची पावभाजी देण्याची पद्धतही वेगळी.
साधी पावभाजी, चिज पावभाजी, ड्रायफ्रुट पावभाजी, खडा पावभाजी (भाज्या तशाच ठेऊन केलेली भाजी), पनीर पावभाजी, जैन पावभाजी, हे तर आता पावभाजीचे नॉर्मल प्रकार झाले.