Business Woman : घरगुती टिफीन सर्व्हिसेस ते क्लाऊड किचन; उद्योजक महिलेचा 'चविष्ट प्रवास'
सुप्रिया शिरसाट यांच्या व्यवसायाची सुरुवात ऑफिसला डब्बे पुरवण्यापासून झाली. नंतर हेच जेवणाचे डब्बे कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये पोहोचू लागले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेवणाच्या डब्ब्यांना दिवसेंदिवस मागणी वाढत गेली. वाढलेल्या मागणीमुळे जेवणाच्या डब्ब्यांचं रुपांतर 'थाली'मध्ये झालं.
त्यानंतर त्यांनी घरगुती जेवण आणि प्रीमियम थाली या दोन प्रकारात जेवण देण्यास सुरुवात केली.
जेवणातल्या काही वैशिष्ट्यांमुळे अल्पावधीतच लोकांपर्यंत त्यांच्या रुचकर जेवणाची माहिती अनेकांपर्यंत पोहचली. जेवण ताजं आणि चविष्ट असल्याने लोकांच्या पसंतीस उतरले.
कोथंबीर वडी, अळू वडी, मुंग डाळ हलवा, बिर्याणी इत्यादी पदार्थ सुप्रिया शिरसाट यांचे खास पदार्थ लोकांच्या पसंतीस उतरले.
कॉर्पोरेट ऑफिसेसला भासणारी जेवणाच्या डब्ब्याची उणीव सुप्रिया शिरसाट यांच्या 'थाली ओ मेनिया' ने भरून काढली.
घरातून मिळालेलं सहकार्य आणि उद्योगातच निर्माण झालेलं भांडवल यामुळे सुप्रिया शिरसाट यांचा क्लाऊड किचनपर्यंतचा प्रवास सहज पार करणं शक्य झालं.