आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडविरोधात मुंबईत आंदोलन; पाहा फोटो
मुंबईतील आरे जंगलात पुन्हा मेट्रोसाठी कारशेड बनवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. शिंदे गट आणि भाजप सरकारने त्यासाठी हालचाली सुरू केल्याचे वृत्त आहे. महाविकास आघाडी सरकारने आरे ऐवजी कांजूरमार्ग व इतर पर्याय पाहण्यास सुरुवात केली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात मुंबईतील पर्यावरणप्रेमींनी आज आरे जंगलात आंदोलन केले. मेट्रो कारशेड कांजूरमार्ग अथवा इतरत्र नेण्यात यावा अशी मागणी आंदोलकांनी केली
या आंदोलनात तरुणाई मोठ्या प्रमाणावर उतरली होती. त्याशिवाय स्थानिक आदिवासींनीदेखील आंदोलनात सहभाग घेतला. आरे जंगलातील जैवविविधतेचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
आकर्षक पोस्टर, बॅनर , गाणी, घोषणाबाजी या वेळी करण्यात आली.
या आंदोलनात चिमुकलेही सहभागी झाले होते. त्यांच्या हातात पर्यावरणाचे महत्त्व सांगणारे पोस्टर होते.
विकासाला, मेट्रोला विरोध नाही. मात्र, पर्यावरणाची हानी नको अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
भाजप वगळता जवळपास इतर सर्वच राजकीय पक्षांनी आरेतील मेट्रो कारशेडला विरोध दर्शवला आहे.