Aarey Metro Car Shed : बहुचर्चित 'आरे' मेट्रो कारशेडची सध्या काय आहे स्थिती...
आरे येथील मेट्रो तीनच्या कारशेडचे काम 2019 पासून स्थगित करण्यात आले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पुन्हा एकदा या कामाला गती मिळेल असे चित्र निर्माण झाले आहे.
अशी कारण म्हणजे कालच पहिल्याच कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामाचा रिपोर्ट मागितला आहे.
त्यामुळे आम्ही देखील आरे कॉलनी येथे जाऊन किती टक्के पूर्ण झाले याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला.
जी जमीन मेट्रो कार शेड साठी अधिग्रहित करण्यात आली आहे, त्यावर परिस्थिती जैसे थे असल्याचे आमच्या पडताळणीमध्ये दिसून आले.
केवळ 10 ते 15 टक्केच काम इथे झालेले आढळले. काही अपूर्ण बांधलेल्या इमारती देखील दिसून आल्या.
तर याच जागेमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा देखील आढळली. हे काम अद्याप रखडलेलंच आहे.
2019 साली उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी पहिला निर्णय आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा घेतला होता.
त्याआधी देवेंद्र फडणवीस असताना या कामाला गती मिळाली होती. खुद्द पंतप्रधान मोदींनी या कामाचं उद्घाटन केलं होतं.
हजारो लोक तत्कालिन फडणवीस सरकारच्या या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले होते. याविरोधात पर्यावरणप्रेमी कोर्टात देखील गेले होते.