The Burning Car : मुंबईत दादरमध्ये भरधाव कारला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी नाही, कार जळून खाक
प्रशांत बढे, एबीपी माझा
Updated at:
07 Aug 2023 07:05 AM (IST)
1
मुंबईत दादरच्या टिळक पुलावर मध्यरात्री एका भरधाव स्विफ्ट डिजायर मोटर कारने पेट घेतला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संपूर्ण कार जळून खाक झाली आहे.
3
काल मध्यरात्री मयुर सावला हे त्यांच्या चार मित्रांसह माहिमवरुन आंबेडकर मार्गाच्या दिशेने निघाले होते.
4
प्लाझा सिनेमाजवळ त्यांच्या गाडीतून धूर येऊ लागला.
5
काही वाहनचालकांनी त्यांना सावध केले आणि त्यांनी टिळक पुलावर गाडी थांबवली.
6
तोपर्यंत गाडीने पेट घेतला.
7
कारला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
8
त्यांनी काही क्षणात आगीवर नियंत्रण मिळवले.
9
तोपर्यंत पुलावरील वाहतूक थांबवण्यात आली होती.