'रिफायनरी हटवा, कोकण वाचवा'; मुंबईत बारसू रिफायनरीविरोधात रेल्वे, मेट्रोत कोकणवासीयांची बॅनरबाजी
Barsu Refinery: कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्प सध्या राज्यात राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबारसूच्या जमीनीवर रिफायनरी प्रकल्प उभारण्यासाठी हालचाली सुरु आहेत, ज्याला स्थानिकांचा विरोध होतोय.
आपल्या जमिनी वाचवण्यासाठी स्थानिक रस्त्यावर उतरलेत. पण तरिही हा प्रकल्प कोकणवासियांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होतोय.
बारसू सर्वेक्षणालाही स्थानिकांकडून आंदोलन करत विरोध करण्यात आलेला.
हजारो पोलिसांच्या बंदोबस्तात बारसूत सर्वेक्षण पार पाडलं जातंय.
कोकणातील बारसू रिफायनरीवरून कोकणवासिय, राजकीय मंडळी यांच्यातही वादंग सुरू आहे.
रिफायनरीविरोधात आता कोकणवासियांचा आवाज आणखी बुलंद झाला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
मुंबईत मात्र बारसू रिफायनरी विरोधात कोकण वासियांकडून पोस्टर्सच्या माध्यमातून निषेध नोंदवला जातोय.
मुंबईच्या विविध स्थानकावर आणि रेल्वे, मेट्रोत पोस्टरच्या माध्यमातून निषेध नोंदवला जात आहे.
'रिफायनरी हटवा, कोकण वाचवा', अशा आशयाचे पोस्टर्स मुंबईतील कोकणवासीयांकडून झळकावण्यात आलेत.