Sharad Pawar Resigns: आज, उद्या, परवा... साहेब, साहेब आणि फक्त साहेबच; पोस्टर्स झळकावून कार्यकर्त्यांकडून शरद पवारांची मनधरणी
Sharad Pawar Resigns: आजही राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. तसेच, शरद पवारांनी अध्यक्षपदी कायम राहावं यासाठी बॅनरबाजी सुरू आहे.
Sharad Pawar Resigns | Maharashtra Politics
1/10
'लोक माझे सांगाती' याच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली.
2/10
शरद पवारांच्या घोषणेनंतर सभागृहात एकच गदारोळ झाला. साहेब निर्णय मागे घ्या, कार्यकर्त्यांनी मागणी करत ठिय्या दिला.
3/10
तेव्हापासूनच आजपर्यंत कार्यकर्ते अजुनही शरद पवारांची मनधरणी करत आहेत.
4/10
कार्यकर्त्यांनी जिल्ह्याजिल्ह्यात पोस्टरबाजी करत शरद पवारांना निर्णय मागे घेण्याचं आवाहन केलं आहे.
5/10
आजही राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे.
6/10
शरद पवार यांनी आपला अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
7/10
शरद पवार आज सकाळी साडेदहा वाजता वाय. बी. चव्हाण सेंटर येथे कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत.
8/10
सकाळी अकरा वाजता प्रदेश कार्यालयात कमिटी प्रस्ताव पारित करेल आणि त्यानंतर तो शरद पवार यांना कळविण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे.
9/10
2024 लोकसभा निवडणुका होईपर्यंत शरद पवार राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदावर कायम राहतील, अशी माहिती सुत्रांच्या हवाल्यानं मिळत आहे.
10/10
राष्ट्रवादीच्या मुंबईतील कार्यालयाबाहरे सध्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी पाहायला मिळत आहे.
Published at : 05 May 2023 10:12 AM (IST)