देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या हायटेक चालत्या फिरत्या महिलांसाठीच्या स्नानगृहाचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांच्या मागणीतून हे चालते फिरते स्नानगृह महिलांसाठी सुरू करण्यात आले आहे.
देशातील हे पहिले महिलांसाठी स्नानगृह असून अत्याधुनिक सोयी सुविधा या स्नानगृहामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत महिलांसाठी मोफत स्नान आणि आंघोळीची ओली कपडे धुण्यासाठी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आमदार भातखळकर यांनी मागणी केल्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या निधी उपलब्धेतून हे चालते फिरते स्नानगृह उपलब्ध करून देण्यात आले आहे.
महिलांना अंघोळी सोबतच ओली कपडे धुण्याचा लाभ घेता येणार आहे. आज मुंबईत देशातील पहिलं चालतं-फिरतं स्नानगृह महिलांच्या सेवेत सुरू झालं.
गेल्या 1 वर्षांपासून चालत्या फिरत्या स्नानगृहासाठी आम्ही प्रयत्नशील होतो, आज ते पूर्णत्वास गेल्याचा आनंद असल्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलंय