Mumbai ganeshotsav 2024: मुंबईतील सर्वात श्रीमंत, सोन्या-चांदीने मढवलेल्या GSB गणपती बाप्पांची पहिली झलक
मुंबईतील गणेशोत्सावाला आजपासूनच सुरुवात झाली असून लालबागच्या राजानंतर मुंबईतील प्रसिद्ध जी.एस.बी गणपतीचेही भाविकांना आज विराट दर्शन झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवडाळ्यातील किंग सर्कल येथील जीएसबी मंडळाच्या या बाप्पांच्या आगमनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भक्तांना लाडक्या गणरायाची आतुरता होती.
मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची तयारीही आता अंतिम टप्प्यात आहे. मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळख असलेल्या किंग संर्कलच्या गणरायाची पहिली झलक भाविकांना आज पाहायला मिळाली.
गौड सारस्वत ब्राह्मण (जी.एस.बी.) गणपती सेवा मंडळाने गतवर्षी तब्बल 360 कोटी 40 लाखांचा विमा काढला होता.
गणेश मंडळात दर्शनासाठी होणारी भाविकांची गर्दी आणि मूर्तीच्या अंगावरील मौल्यवान दागिन्यांचा विचार करून सुरक्षेच्या दृष्टिने हा निर्णय घेण्यात आला होता.
दरवर्षी लाखो भाविक जीएस बी सेवा मंडळ, किंग सर्कल येथे बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची गर्दी, बाप्पावर असलेल्या दागिने आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंडळाच्या वतीने योग्य खबरदारी घेत योग्य पाऊले उचलली जातात.
मंडळाचे यंदाचे 69 वे वर्ष असून तो 5 दिवस बसवण्यात येतात. जीएसबी महागणपती हा सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जातो.