Lalbaugcha Raja 2024 First Look: आला रे आला... लालबागचा राजा आला; पाहा गणपती बाप्पाची पहिली झलक
लालबागच्या राजाची (Lalbaugcha Raja) आज पहिली झलक पाहायला मिळाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलालबागच्या राजाच्या लूकचे अनावरण झाले की मुंबईत गणेशोत्सव सुरू होतोय, असं मानलं जातं.
अगदी पारंपारिक पद्धतीने राजाची पहिली झलक दाखवण्यात आली. यंदाचं लालबागच्या राजाचं हे 91 वं वर्ष आहे.
यंदा लालबागच्या राजाचा पोशाख मरुन रंगाचा आहे.
पुतळाबाई चाळीमध्ये असलेला लालबागचा राजा किंवा ‘किंग ऑफ लालबाग’ हे मुंबईतील सर्वाधिक भेट दिलं जाणारं गणेश मंडळ आहे.
लालबागचा राजाची विशेष ख्याती आहे. यंदा लालबाग राजाला काशी विश्वनाथ मंदिराची थीम ठेवण्यात आहे
सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत लाखो मुंबईकर दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगांत उभे राहतात.
गणपती आणि लालबाग हे समीकरण फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण राज्यभरात माहित आहे.