अवजड केलं सोपं... मुंबईतील गोखले पुलावर महाकाय 'तुळई' 25 मीटर यशस्वीपणे सरकवली
अंधेरी पूर्व -पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले पुलाच्या दक्षिण बाजूची लोखंडी तुळई (गर्डर) रेल्वे भागावर 25 मीटरपर्यंत सरकविण्याची कार्यवाहीरात्री यशस्वीपणे पार पडली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाकाय अशी ही तुळई एकूण 86 मीटर सरकविणे आवश्यक असून पैकी 25 मीटरपर्यंत सरकविण्यात आली आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या परवानगीनंतर व पुढील रेल्वे 'ब्लॉक' मिळाल्यानंतर उर्वरित अंतरावर ही तुळई सरकविण्याची कार्यवाही केली जाईल.
बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून पश्चिम रेल्वेसोबत त्यादृष्टीने समन्वय साधण्यात येत आहे.
अंधेरी पूर्व आणि पश्चिम दिशेच्या वाहतुकीदरम्यान महत्त्वाचा दुवा असलेल्या गोपाळ कृष्ण गोखले पुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे.
पुलाचा हा भाग सर्वसामान्य जनतेसाठी दिनांक 26 फेब्रुवारी 2024 पासून वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यावरून हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात आला आहे.
आता या पूल उभारणीतील महत्वाचा टप्पा म्हणजे दुसरी तुळई स्थापन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून तुळई रेल्वे भागावर 25 मीटरपर्यंत सरकविण्याचे कामकाज यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले.