Mumbai Flower Exhibition : रंगीबेरंगी फुलांनी तयार केले प्राणी आणि पक्षी, मुंबईतील प्रदर्शनाची झलक, पाहा फोटो
या बागेत फुलं आणि पानांपासून तयार केलेल्या विविध कलाकृती प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्हीही या बागेत जाऊन तुम्ही या प्रदर्शनाचा आनंदही घेऊ शकता. हिरवळ आणि रंगीबेरंगी फुलांनी नटलेल्या कलाकृती पाहण्याचा आनंद तुम्हाला घेता येईल.
विविध रंगांनी नटलेल्या या प्रदर्शनाला आज सुरुवात झाली असून हे प्रदर्शन 26 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे.
24 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत सकाळी 11 वा.ते संध्याकाळी 7 वा. या वेळेत तुम्ही प्रदर्शनाला भेट देऊ शकता.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्था येथे हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे
यामध्ये तुम्हाला विविध रंगांच्या फुलांनी बनवलेले प्राणी, पक्षी तसेच विविध कलाकृती पाहायला मिळतील.
यामध्ये फुलझाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, भाजीपाला, गुलाब आणि बोन्साय अशा विविध प्रकारच्या वनस्पतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे.
धारावी येथे महाराष्ट्र निसर्ग उद्यानात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे.
फुलांनी साकारलेले हत्ती आणि मोर यांचा हे या प्रदर्शनाचं आकर्षण आहे.
आज महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटनपार पडलं असून ते सर्वांसाठी खुले करण्यात आलं आहे.
24 फेब्रुवारीपासून सुरु झालेलं हे प्रदर्शन 26 फेब्रुवारी पर्यंत असणार आहे. प्रदर्शनासाठी तीनही दिवस विनामूल्य प्रवेश असेल.
image 13
image 15
image 16
image 17
image 18
image 19
image 20
image 21
रंगीबेरंगी फुलांनी तयार केले प्राणी आणि पक्षी पाहण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता.
विविध प्रकारची झाडे तसेच औषधी वनस्पतीही तु्म्हाला पाहता येतील.
त्यामुळे या प्रदर्शनाला एकदा नक्की भेट द्या