BEST Bus Fire : भर गर्दीच्या वेळी मुंबईत 'बर्निंग बस'चा थरार; अंधेरी स्थानकाजवळ बस जळून खाक

मुंबईत अंधेरी स्थानकाजवळील बेस्टच्या एसी बसला आज संध्याकाळच्या सुमारास भीषण आग लागली.

BEST Bus Fire : भर गर्दीच्या वेळी मुंबईत 'बर्निंग बस'चा थरार; अंधेरी स्थानकाजवळ एसी बस जळून खाक

1/9
मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशन परिसरात आगरकर चौक बस डेपो जवळ बसला मोठी आग लागली.
2/9
आज बुधवारी, संध्याकाळी 6:30 च्या सुमारास बेस्टची बस प्रवासासाठी निघत असताना आग लागली.
3/9
आग लागली असल्याचे समजताच बसमधून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
4/9
घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी तातडीने धाव घेतली.
5/9
अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर केले. जवळपास 7.15 वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले.
6/9
बसला लागलेल्या आगीमुळे अंधेरी स्थानकाकडे जाणारा एक मार्ग बंद करण्यात आला होता. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि लोकांची गर्दी झाली होती.
7/9
या आगीत बेस्टची बस संपूर्णपणे जळून खाक झाली.
8/9
गेल्या काही दिवसांमध्ये बेस्टच्या बसमध्ये आग लागण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत.
9/9
बसला आग लागण्याच्या घटना घडत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Sponsored Links by Taboola