Vada Pav : 'मुंबईचा वडापाव' जगात भारी; 'जगातील 50 सर्वोत्तम सँडविच'च्या यादीत वडापावचाही नंबर
मुंबईमध्ये सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट फूड म्हणजे वडापाव (Vad Pav). मुंबईकरांचं आणि वडापावचं नातं अगदी वेगळंच आहे. ( Image Source : istockphoto )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्ही कोणत्याही वेळी वडापावचा आस्वाद घेऊ शकता. चहा, नाश्ता असो किंवा जेवण तुम्ही कधीही वडापाव खाऊ शकता. ( Image Source : istockphoto )
वडापाव हा जणू मुंबईकरांच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनला आहे. अगदी रस्त्यावर राहणारा व्यक्ती असो किंवा श्रीमंत व्यक्ती वडापाव सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. ( Image Source : istockphoto )
आनंदाच्या क्षणी असो वा दुखाच्या क्षणी, पोटाची भूक भागवण्याचा उत्तम आधार म्हणजे वडापाव. ( Image Source : istockphoto )
अशा या मुंबईच्या वडापावला आता जागतिक मान्यता मिळाली आहे. जगातील 50 सर्वोत्कृष्ट सँडविचच्या यादीत वडापावला स्थान मिळालं आहे. ( Image Source : istockphoto )
मुंबईच्या प्रसिद्ध स्ट्रीट फूड वडापावला आता जागतिक मान्यता मिळाली आहे. जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत वडापाव तेराव्या क्रमांकावर आहे. ( Image Source : istockphoto )
टेस्ट ॲटलसच्या (Taste Atlas) जगातील 50 सर्वोत्कृष्ट सँडविचच्या यादीमध्ये मुंबईच्या वडापावने स्थान मिळवलं आहे. ( Image Source : istockphoto )
टेस्ट ॲटलस (Taste Atlas) ही फूड ट्रॅव्हल गाईड वेबसाईट आहे. यामध्ये जगभरातील पारंपारिक खाद्यपदार्थांसाठी मार्गदर्शक माहिती प्रसिद्ध केली जाते. यावर जगभरातील विविध पाककृती आणि लोकप्रिय पदार्थ याबाबत माहिती दिली जाते. ( Image Source : istockphoto )
टेस्ट ॲटलस या जागतिक फूड ट्रॅव्हल गाईडच्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत वडापाव तेराव्या क्रमांकावर आहे. ( Image Source : istockphoto )
जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत मुंबईच्या वडापावला तेरावं स्थान मिळालं आहे. या यादीत तुर्कीचं टॉम्बिक सँडविच पहिल्या क्रमांकावर आहे. ( Image Source : istockphoto )
त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर पेरुचं बुटीफारा सँडविच आणि अर्जेंटिनाचा डी लोमो सँडविचचा तिसरा क्रमांक आहे. ( Image Source : istockphoto )