Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Attack: 26/11 हल्ल्याला 15 वर्ष पूर्ण, तर राज्यपालांसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून शहीदांना अभिवादन
मुंबईतील पोलीस आयुक्त कार्यालयात राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुंबई पोलीस आयुक्तांची उपस्थिती होती
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील अधिकारी यांना राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली
तसेच त्यांच्या स्मृती स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सर्व मान्यवरांनी उपस्थित शहिदांच्या कुटुंबाची भेट घेऊन सहसंवेदना व्यक्त केल्या.
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज पंधरा वर्ष पूर्ण होत आहेत.
पाकिस्तानातून आलेल्या दहा दहशतवाद्यांनी मुंबई हादरवून टाकली होती.
दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात शेकडो लोक मृत्यूमुखी पडले, तर कित्येक लोकांनी आपलं सर्वस्व गमावलं.
आजही दहा वर्षानंतर या हल्ल्याच्या जखमा ताज्या आहेत. मुंबई पोलीस, एटीएस अधिकारी, एनएसजी कमांडो, मार्कोस, अग्निशमन जवानांनी प्राण पणाला लावत नऊ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
तर तुकाराम ओंबळे यांनी स्वत:चा जीव देऊन अजमल आमीर कसाब या एकमेव दहशतवाद्याला जिवंत पकडलं.