Shiv Sena Clash : मुंबईतील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर ठाकरे-शिंदे गटात राडा; पाहा फोटो
शिवसेना प्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदोन्ही बाजूंनी धक्काबुक्की आणि घोषणाबाजी झाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करून गेल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये राडा झाला.
सध्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली असल्याचा आरोप शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केला.
शिंदे गटाने केलेले आरोप ठाकरे गटाने फेटाळून लावले आहेत. कोणी सुरुवात केली, आक्षेपार्ह वर्तन केले हे कॅमेऱ्यात कैद झाले असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अॅड. अनिल देसाई यांनी म्हटले.
17 नोव्हेंबर रोजी बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने शिवसैनिक येत असतात. स्मृतीदिन कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते दाखल झाले होते.