PHOTO : संभाजीराजे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचं कारण काय?
राज्यसभा खासदारपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर आज कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफडणवीसांचे शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर ही भेट झाली. या भेटीमुळे अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.
या भेटीनंतर बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी खासदारपदासाठी संधी दिल्याबद्दल आभार मानण्यासाठी ही भेट असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे खासदारकीची संधी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी मला राज्यसभा खासदारकीची संघी दिल्यामुळे मला गडकिल्ल्यांचे काम करता आले म्हणून आभार व्यक्त केले असल्याचे त्यांनी म्हटले
आज देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीत राजकीय चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. दोन राजकीय व्यक्ती भेटल्यानंतर त्यांच्यामध्ये राजकीय चर्चा होणारच असल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसी आरक्षणासाठी कोर्टाच्या निर्देशांचे पालन करावे लागणार असल्याचे त्यांनी म्हटले
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं ते सर्वांसाठी होतं. केवळ मराठ्यांशी नव्हतं, शाहू महाराजांनी देखील आरक्षण बहुजनांना दिले. त्यामुळे मी देखील बहुजनांसाठी आणि मराठ्यांनाआरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
राजकारणात प्रवेश करणार असल्याचे निश्चित असल्याचे त्यांनी म्हटले. याबाबत 12 तारखेला भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी म्हटले. पुढे काय करायचं हे माझ्या डोक्यात ठरलेलं आहे, त्यामुळे 12 तारखेला हे जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.