MMRDA Flowers Exhibition : रंगीबेरंगी फुलझाडे आणि वनस्पतींचं प्रदर्शन, MMRDA चा अभिनव उपक्रम
धारावीतील महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्था येथे विविध औषधी तसेच फुल झाडांचं तीन दिवसीय प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. येथे तुम्हांला रंगीबेरंगी फुलझाडे आणि वनस्पती पाहायला मिळतील. (PC:MaheshKole)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविविध रंगी फुलांपासून वेगवेगळ्या प्रकारची सजावट करण्यात आली आहे. फुलांचा वापर करून विविध सुंदर कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. मुंबईकर याचा आनंद घेऊ शकतात. (PC:MaheshKole)
कुंड्यांमध्ये वाढविलेली फळझाडे आणि फुलझाडे, फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोनसाय ट्री तसेच कृष्णवडासारख्या अनेक दुर्मिळ देशी प्रजातींची झाडे देखील यंदाच्या प्रदर्शनात तुम्हाला पाहता येतील. (PC:MaheshKole)
महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास भा. प्र.से. यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन पार पडलं आहे. 26 फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी विनामूल्य खुलं करण्यात आलं आहे. (PC:MaheshKole)
निसर्ग संवर्धनाबाबत जनजागृतीसाठी एमएमआरडीएचा अभिनव उपक्रम आहे. प्रदर्शनाचे हे पहिलेच वर्ष असून, हे प्रदर्शन मुंबईकरांसाठी विनामूल्य असणार आहे. (PC:MaheshKole)
24 फेब्रुवारीपासून या प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. आकर्षक असे फुलांनी सजवलेलं हत्ती आणि मोरही या प्रदर्शनात आहेत. (PC:MaheshKole) (PC:MaheshKole)
या प्रदर्शनात सनटेक, गोदरेज, हिरानंदानी, BARC, मुंबई रोझ सोसायटी, इंडियन बोन्साय सोसायटी, टाटा पॉवर, भारत डायमंड बोर्स, मुंबई महानगरपालिका, सोमय्या महाविद्यालय अशा संस्थांनी भाग घेतला आहे. (PC:MaheshKole)
या प्रदर्शनासोबतच विक्री दालनांमध्ये विविध प्रकारच्या झाडांची रोपे, बियाणे, खते उपलब्ध करण्यात आली आहेत. (PC:MaheshKole)
या प्रदर्शनात हंगामी फुलझाडांच्या 45 प्रजाती, कुंड्यांमध्ये वाढलेल्या शोभिवंत झाडांच्या 48 प्रजाती, फुलझाडांच्या 52 प्रजाती तुम्हांला पाहता येतील. (PC:MaheshKole)
तसेच गुलाबाच्या 29 प्रजाती आणि औषधी आणि सुगंधी वनस्पतींच्या 50 प्रजाती प्रदर्शनार्थ ठेवण्यात आल्या आहेत. (PC:MaheshKole)
यासोबतच बोन्सायच्या 30 प्रजाती ही तुम्हाला प्रदर्शनात पाहायला मिळतील. (PC:MaheshKole)
मुंबईच्या मिठी नदीच्या काठावर असलेल्या 37 एकरमध्ये पसरलेल्या महाराष्ट्र निसर्ग उद्यानात हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. (PC:MaheshKole)
निसर्ग संवर्धनाबाबत महत्त्व समजावून त्याबाबत जनजागृती करण्यासाठी एमएमआरडीएचा हा प्रयत्न आहे. (PC:MaheshKole)
यंदा प्रदर्शनाचं पहिलं वर्ष असून या प्रदर्शनास नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी, असं आवाहन MMRDA महानगर आयुक्तांनी केलं आहे. (PC:MaheshKole)
एक सुंदर आणि आल्हाददायी अनुभव घेण्यासाठी या प्रदर्शनाला नक्की भेट द्या. (PC:MaheshKole)