Mira Bhayandar : मीरा-भाईंदरच्या काशिमीरा परिसरात रस्त्याला भगदाड, सिमेंट मिक्सरचा ट्रक खड्ड्यात पडून मोठा अपघात
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
05 Dec 2024 10:47 AM (IST)
1
अपघातात सिमेंट मिक्सरचा ट्रक चालक जागीच ठार झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
3
अपघाताची माहिती मिळताच काशिमीरा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
4
सिमेंट मिक्सरचा ट्रक क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आला.
5
सध्या तेथे मेट्रोच काम सुरु आहे आणि मेट्रोच्या पिलरच्या खालील रस्ता अचानक खचला जावून, मोठं भगदाड पडलं होतं.
6
अपघाताचं कारण, रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाकडे बोट दाखवले जात आहे.
7
स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
8
सध्या काशिमीरा पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत.