Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री; नाव जाहीर होताच विधिमंडळात काय काय घडलं?
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं आहे. आज भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. (Image Credit- ABP Majha)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज भाजपाची केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपाची महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड केली. (Image Credit- ABP Majha)
या सर्व निवड प्रक्रियेनंतर आता देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झाले आहे. (Image Credit- ABP Majha)
भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा विधिमडंळ गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला पंकजा मुंडे यांनी अनुमोदन दिले.(Image Credit- ABP Majha)
चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या प्रस्तावाला प्रवीण दरेकर, पंकजा मुंडे यांच्यासह अनेकांनी अनुमोदन दिले. (Image Credit- ABP Majha)
यानंतर केंद्रीय निरीक्षक म्हणून महाराष्ट्रात आलेले विजय रूपानी यांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्याचं जाहीर केले. (Image Credit- ABP Majha)
देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहीर होताच विधिमंडळात 'देवाभाऊ'च्या घोषणा देण्यात आल्या. (Image Credit- ABP Majha)
देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर राज्यातील भाजपच्या कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. (Image Credit- ABP Majha)
देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सगळ्यांचे आभार मानले. एकमताने माझी विधिमंडळ गटनेतापदी निवड केली. यावेळची निवडणूक अतिशय ऐतिहासिक होती. एक है तो सेफ है हे या निवडणुकीच्या निकालानं स्पष्ट केलं. तर मोदी है तो मुमकीन है हे लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झालं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Image Credit- ABP Majha)