Maratha reservation protest : मराठ्यांचा सीएसएमटीसमोर चक्काजाम, आंदोलक रस्त्यावर बसले.
मराठा वादळ मुंबईपर्यंत जाऊन पोहोचलं आहे. सीएसएमटीसमोर मुख्य रस्त्यावर दुतर्फा वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे सीएसएमटी परिसरात प्रचंड गर्दी झाली आहे.(Image Credit - Reporter Mumbai)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठा आंदोलकांनी सीएसटीच्या बाहेर आंदोलन सुरु केलं आहे. शेकडोंच्या संख्येनं आंदोलक मुख्य रस्त्यावर बसले आहेत. आजचा दिवस (26 जानेवारी) मराठा आरक्षणासाठी निर्णायक राहणार आहे. (Image Credit - Reporter Mumbai)
सरकारी पातळीवर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे शिष्टमंडळ पाठवून तोडगा निघतो का? पाहिलं जात आहे. (Image Credit - Reporter Mumbai)
मात्र, जरांगे मागण्यांवर ठाम असल्याने सरकार आता यावर कसा तोडगा काढणार? आणि मुंबईमधील परिस्थिती कशी हाताळणार? यावर आता बरच काही अवलंबून असणार आहे. (Image Credit - Reporter Mumbai)(Image Credit - Reporter Mumbai)
दरम्यान, सीएसटी परिसरात गर्दी झाल्यानंतर मुंबई पोलिस सक्रिय झाले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी आंदोलकांना विनंती करून बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहेत. (Image Credit - Reporter Mumbai)
मराठा मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी गर्भित इशारा दिला आहे. केवळ सीएसएमटी नाही, तर आम्ही संपूर्ण मुंबईचा ताबा घेणार आहोत, आंदोलकांना आवाहन करतोय की सर्वांनी आझाद मैदानात यावं असं त्यांनी म्हटलं आहे. (Image Credit - Reporter Mumbai)
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुढची चर्चा आपण करूया. राज्य सरकारच्या शिष्टमंडळांना जीआरसाठी जी काय कागदपत्रे समोर ठेवली आहेत त्यात काय दुरुस्ती आहे, त्यात नेमक्या कोणत्या मागण्या मान्य होत आहेत, ते सगळं आपण चर्चा करून ठरवू.(Image Credit - Reporter Mumbai)
कोणताही निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही, सगळ्यांसमोर चर्चा करून निर्णय घेईल, असे मनोज जरांगे म्हणाले आहेत(Image Credit - Reporter Mumbai)