Mumbai: जालन्यातील घटनेविरोधात मुंबईत आंदोलन; गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मराठा समाज आक्रमक
जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजालना जिल्ह्यात शुक्रवारी पोलिसांकडून मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज करण्यात आला, या संतप्त घटनेनंतर राज्यभरातील मराठा समाज एकवटला आहे.
राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. मुंबईतील दादर परिसरात देखील मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं.
जालन्यात झालेल्या लाठीचार्जमध्ये अनेक मराठा समाजाचे आंदोलक जखमी झाले, यावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. मुंबईतही या घटनेविरोधात निषेध व्यक्त केला जात आहे.
राज्यात ठिकठिकाणी निषेध आंदोलन सुरू आहे. आता मुंबईतही निषेध आंदोलन करण्यात येत आहे.
हातात निषेध व्यक्त करणारे फलक घेऊन मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं.
मराठा समाजाच्या वतीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मराठा समाजाकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.
जालन्यातील प्रकारानंतर एकूणच मराठा समाज संतप्त झाला आहे.
राज्यभरातील विविध ठिकाणच्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग घेतला आहे.