Majha Sanman 2023 : 'माझा'च्या व्यासपीठावर दिग्गजांचा गौरव, 'माझा सन्मान पुरस्कार' सोहळ्याची क्षणचित्रे
26 आणि 27 ऑगस्ट रोजी 'माझा सन्मान पुरस्कार' सोहळ्याचं 'एबीपी माझा'वर प्रक्षेपण होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमेरिकेच्या संसदेत आपला मराठी ठसा उमटवणारे पहिले मराठी खासदार श्री ठाणेदार यांचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून ज्याने ओळख निर्माण केली असा अस्सल मुंबईकर असलेल्या शार्दुल ठाकुरचा सन्मान या पुरस्कार सोहळ्यात करण्यात आला आहे.
हरहुन्नरी अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा माझा पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने सन्मान करण्यात आला आहे.
उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी अशोक जैन यांचा एबीपी माझाच्या 'माझा सन्मान' पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.
वाबळेवाडीच्या शाळेचा कायापालट करुन महाराष्ट्राचे नाव गाजवणाऱ्या वारे गुरुजींना एबीपी माझाच्या वतीनं 'माझा सन्मान' पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आलं.
ज्यांच्या शीर्षकगीताने पाच दशकं मुक्त भ्रमंती केली असे जेष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना माझा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पाच दशकं संगीतविश्वावर आपला अमीट आणि अवीट ठसा उमटवणारे स्वराधिक म्हणजे सुरेश वाडकर यांना देखील कृतज्ञतापूर्वक एबीपी माझाकडून माझा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या, सिनेमाला श्वास मानणाऱ्या आणि बाईपण खरंच कळलेल्या भारी केदार शिंदे यांना एबीपी माझाच्या पुरस्कार सोहळ्यात गौरवण्यात आलं.
किर्तनाचा ध्यास धरत ज्यांनी देशभरातील जवळपास 14 हजार गावांमध्ये किर्तनाची सेवा पुरवली असे किर्तनकार सत्यपाल महाराज यांना कृतज्ञतापूर्वक माझा सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आलं.
'माझ्या मराठीचे बोलू कौतुके परि अमृतातेही पैजा जिंके' अशा आपल्या मराठीची श्रींमती शब्दश: आपल्या समोर मांडणाऱ्या सुरेश वाघे यांचा सन्मान माझा सन्मान पुरस्कार सोहळ्यात करण्यात आला आहे.