Mahashivratri 2023 : मुंबईतील प्रसिद्ध मुंबादेवीला महाशिवरात्रीनिमित्त द्राक्षांची आरास!
मुंबादेवीला महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर द्राक्षांची सुंदर आरास केलेली आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी ही सुंदर आरास केलेली आहे
महाशिवरात्री निमित्त मुंबईच्या मुंबादेवीचे दर्शन पहाटे 4 पासून सर्वांना खुले असणार आहे.
सकाळी 8 वाजता आरती, दुपारी 12 वाजता राजभोग असणार आहे.
रात्री 8 वाजता आरती तर रात्री 12 वाजता महाआरती करण्यात येणार आहे...
मुंबादेवीच्या दर्शनासाठी भक्तांनी मंदिरात मोठी गर्दी केली.
महाशिवरात्री निमित्ताने मुंबादेवीचे मंदिर सजवण्यात आलेलं आहे.
अयोध्या आणि उज्जैनच्या धर्तीवर मुंबादेवी तीर्थक्षेत्रांचा कायापालट करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती.
महाशिवरात्री मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. या दिवशी महादेव आणि माता पार्वतीची भक्तिभावाने पूजा केली जाते. यामुळे भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा भाविकांचा विश्वास आहे.