Governor : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निरोप, मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्री राजभवनात उपस्थित
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज निरोप देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजशिष्टाचार विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर तसेच राजभवनातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज निरोप देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
राजभवनात आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निरोप देण्यात आला. यावेळी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्यपालांचे स्वागत केले.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कार्यक्रमांना स्वतः उपस्थित राहिलेले राज्यपाल अशीही त्यांची ओळख महाराष्ट्राला कायमच राहील. त्यांनी राज्य सरकारला केलेले सहकार्य आणि महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान विसरता येणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कृष्णाची मूर्ती देऊन केलं राज्यपालांचे स्वागत.
पुष्पगुच्छ आणि श्री गणेशाची प्रतिमा भेट म्हणून देऊन त्यांचे शासनाच्या वतीने आभार मानले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यकाळात राजभवनात अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले. तसेच राजभवनातील विस्तारित इमारतीचे बांधकाम करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांच्या वेगवेगळ्या वक्त्व्यांनी कायमच चर्चेत राहिले. त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळं विरोधकांनी त्यांच्यावर वेळोवेळी टीका केली होती.
आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्यपालांनी निरोप दिला. तर काल राजभवनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून राज्यपालांना निरोप देण्यात आला.