Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
PHOTO : मुंबई आयआयटीमध्ये आजपासून टेकफेस्टची धूम
आशियातील सर्वात मोठा टेक फेस्ट म्हणून ओळख असलेल्या आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टला सुरुवात होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनानंतर पुन्हा एकदा जागतिक पातळीवर विज्ञान तंत्रज्ञानात होणाऱ्या प्रगतीच खऱ्या अर्थाने दर्शन या टेकफेस्टच्या निमित्ताने करता येणार आहे.
विविध राज्यातून, देशातून, विद्यार्थी प्रतिनिधी या टेक फेस्टमध्ये सहभागी झाले आहेत. यंदाचा मुंबई आयटी टेकफेस्टचं हे 26 वं वर्ष आहे
कोरोनाच्या दोन वर्षानंतर पुन्हा एकदा विज्ञान तंत्रज्ञान प्रेमी, प्रयोगशील विद्यार्थी प्राध्यापक, संशोधक हे एकाच ठिकाणी जमले आहेत.
यावर्षी टेक कनेक्ट, ऑटो एक्स्पो, इंटरनेशनल एक्झिबिशन, रोबोटिक्स, ड्रोन रेसिंग लीग, इंटरनॅशनल रोबोवॉर हे सगळं या टेकफेस्टमध्ये अनुभवता येणार आहे.
आयआयटी टेकफेस्टच्या इंटरनॅशनल एक्झिबिशनमध्ये प्रथमच ब्रह्मोस मिसाईलबद्दल माहिती दिली जात आहे.
या टेकफेस्टमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय तो गो 1 विद्युत रोबोट जो मूळ तैवानचा रोबोट आहे मात्र भारतामध्ये रिसर्चसाठी आणण्यात आला आहे.
आयआयटी टेक फेस्ट म्हटलं की सगळ्यात जास्त थरार जिथे अनुभवायला मिळतो ते म्हणजे इंटरनॅशनल रोबो वॉर. देश विदेशातून 50 पेक्षा अधिक संघ आलेले आहेत सोबतच साडेबारा लाख रुपयांचे बक्षीस या रोबोवॉर साठी ठेवण्यात आले आहेत.
विज्ञान तंत्रज्ञानाचा अविष्कार अनुभवायचा असेल तर तुम्हाला या आयआयटी टेकफेस्टला म्हणजे खऱ्या अर्थानं विज्ञान तंत्रज्ञानाच्या जत्रेला एकदा तरी भेट द्यावी लागेल