PHOTO : मुंबईत मुसळधार; सखल भागांत पाणीच पाणी, वाहतूक संथगतीनं सुरु
गेल्या 24 तासांपासून मुंबईत अविरत पाऊस सुरु आहे. मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत काही भागात रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झालीय. त्यामुळे वाहतूक संथगतीने सुरू आहे.
त्यामुळं कामावर जाणाऱ्यांनी त्यांच्या मार्गाच्या स्थितीचा आढावा घेऊन घराबाहेर पडा, असा अलर्ट हवामान खात्यानं दिला आहे.
सायन, हिंदमाता परिसरात पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईतील अंधेरी सबवे पाण्याखाली गेलाय. त्यामुळे हा सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
वांद्र्यातील धारावी, कलानगर, अंधेरी सबवे भागांत साचलं पावसाचं पाणी. रस्तेवाहतुकीचा वेग मंदावला, वाहनचालकांचे हाल होत असल्याचं दिसत आहे.
मुंबईत कोसळणाऱ्या पावसाचा परिणाम मुंबई लोकलसेवेवरही होत असल्याचं पाहायला मिळत आहे. लोकल सेवा उशिरानं सुरु आहे.
अशातच मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात दमदार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे तलावांमधील पाणीसाठा 14.80 टक्क्यांवर पोहोचला आहे.
दरम्यान, कोकण विभागात पुढील तीन ते चार दिवस अतिवृष्टीचा इशारा. जुलै महिन्यामध्ये सरासरीच्या तुलनेत 94 ते 106 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.