Eknath Shinde : दालन फुलांनी सजलं, पूजा विधीसह जय्यत तयारी; मुख्यमंत्री शिंदेंचं मंत्रालयात ग्रँड स्वागत
राज्यातील मोठ्या सत्तासंघर्षानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) झाले. मुख्यमंत्री शिंदे आज अधिकृतपणे मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयात पदभार स्वीकारणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यासाठी आज मुख्यमंत्री कार्यालयात पूजा ठेवली आहे. पहाटेपासून त्याची जय्यत तयारी सुरु आहे.
त्यासाठी आज मुख्यमंत्री कार्यालयात पूजा ठेवली आहे. पहाटेपासून त्याची जय्यत तयारी सुरु आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश केला.
मंत्रालयात आगमन झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.
मुख्यमंत्री दालनात बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा मुख्यमंत्री यांच्या खुर्चीच्या मागे आता लावण्यात आली आहे.
शिंदे गट हीच बाळासाहेबांची शिवसेना हे ठासवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात असल्याचं बोललं जात आहे.
मुख्यमंत्री कार्यालयातील पूजेसाठी शिंदे समर्थक आमदारही उपस्थित आहेत.
आमदार यामिनी जाधव, सदा सरवणकर आणि दीपक केसरकर असे आमदार मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचले आहेत.
यावेळी मंत्रायलात सुरक्षा व्यवस्था देखील तगडी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या वेलकमची जोरदार तयारी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.