Dahi Handi: मुंबईत दही हंडीचा थरार; 129 गोविंदा जखमी, दोघे गंभीर, केईएम रुग्णालयात उपचार सुरू
Dahi Handi Celebrations: देशात सोमवारी जन्माष्ठमी आणि मंगळवारी दही हांडी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDahi Handi Celebrations: देशभरात कृष्णजन्माष्ठमी आणि दही हांडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
मुंबईत अनेक भागांत ठिकठिकाणी दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईत दरवर्षीच मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. उंचावर बांधलेल्या दहीहंडी मोठमोठे मानवी मनोरे रचून फोडल्या जातात.
मुंबईत दहीहंडीच्या कार्यक्रमाबाबत प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र, यात अनेक गोविंदा जखमी झाल्याचं वृत्त आहे.
दहीहंडी उत्सवाचा भाग म्हणून मानवी पिरॅमिड बनवणारे 65 गोविंदा जखमी झाले आहेत. मुंबई महापालिकेच्या वतीनं अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
बीएमसीच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, या जखमी गोविंदांना कॉर्पोरेशन संचालित आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हा सण मुंबईसह राज्याच्या इतर भागात पारंपारिक उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. तरुणांसोबतच प्रत्येक वयोगटातील लोकही यात उत्साहानं सहभागी होत आहेत.
दहीहंडी साजरी करणं हा जन्माष्टमी उत्सवाचा एक भाग आहे. यामध्ये तरुण एकमेकांवर मानवी मनोरे रचून उंचावर बांधलेल्या दहीहंड्या फोडतात.
सोमवारी (26 ऑगस्ट) देशभरात जन्माष्टमीचा सण साजरा करण्यात आला आणि त्याच्या एका दिवसानंतर दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतं.
या उत्सवांतर्गत दहीहंडी फोडण्यासाठी आलेले सर्व गोविंदा एकावर एक थर रचतात आणि हवेत उंचावर बांधण्यात आलेली दहीहंडी फोडतात.