पाहा फोटो: दोन वर्षानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात; विविध विभागांना दिली भेट
जवळपास दोन वर्षानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात दाखल आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयात जात नसल्याच्या मुद्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवासस्थानातून राज्य कारभाराची सूत्रे हलवली होती. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मंत्री मंत्रालयात येत असे.
सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली होती. मुख्यमंत्री ऑनलाइन पद्धतीने सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या बैठका घेत असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला होता.
कोरोनाची लाट ओसरत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रकृती अस्वस्थाचा त्रास होऊ लागला होता. मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना वैद्यकीय कारणास्तव विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. या शस्त्रक्रियेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जाहीर कार्यक्रमात उपस्थित राहण्यावर मर्यादा आल्या होत्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडले होते. विरोधकांनी यावेळीही त्यांच्यावर टीका केली होती. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी तात्पुरत्या काळासाठी इतरांकडे देण्याचा सल्लाही विरोधकांनी दिला होता.
शस्त्रक्रियेच्या काही महिन्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा जाहीर कार्यक्रमात हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. मागील काही दिवसांत मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या योजना, प्रकल्पांच्या लोकार्पण, भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात दाखल होताच विविध विभागाचा दौरा केला.