PHOTO : महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलने घेतली शरद पवारांची भेट!
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया भेटीदरम्यान शरद पवार यांनी पृथ्वीराज पाटीलला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिला. सोबतच पृथ्वीराजचा सत्कार सुद्धा करण्यात आला.
पुढील प्रशिक्षणासाठी आणि ऑलिम्पिकसाठी लागणारी मदत देखील केली जाईल, असं आश्वासन शरद पवार यांच्याकडून देण्यात आलं.
शरद पवार हे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. परंतु महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ते साताऱ्यात हजर नव्हते.
महाराष्ट्र केसरी स्पर्धा नुकतीच पार पडली असून अत्यंत अटीतटीच्या सामन्यात कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील याने 5-4 च्या फरकाने मुंबई पश्चिमचं नेतृत्त्व करणाऱ्या विशाल बनकरला मात दिली आहे.विशेष म्हणजे जवळपास 21 वर्षानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीची मानाची गदा मिळाली आहे.
पृथ्वीराज पाटीलने यावेळी शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांची देखील भेट घेतली.