In Pics : नवी मुंबई विमानतळ नामकरणासाठी आज स्थानिकांचा सिडकोवर मोर्चा, पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात
नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद आता पेटण्याचं दिसून येतंय. नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी स्थानिक प्रकल्पग्रस्त नागरिकांची आहे तर शिवसेनेकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी होत आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी आज आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. यासाठी सिडकोवर मोर्चा काढण्यात येणार असून एक लाखांवर लोक सहभागी होणार असल्याचं कृती समितीने पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.
विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी नवी मुंबई, उरण आणि पनवेलमधील प्रकल्पग्रस्तांकडून करण्यात येत आहे.
आजचा सिडकोवरील मोर्चा लक्षात घेता नवी मुंबई पोलिसांनी पाच हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं पोलीस प्रशासनानं काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
महत्त्वाचे रस्ते आणि वाहतूकीत बदल करण्यात आला असून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळं पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या मार्गात बदल होणार आहे.
बुधवारी रात्री भिवंडीतील पिंपळास गावातील ग्रामस्थांमधे जनजागृती व्हावी यासाठी ग्राम विकास युवा प्रतिष्ठान व पिंपळास गावातील काही तरुणांच्या वतीने संपूर्ण गावातून मशाल मोर्चा काढण्यात आला.
दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नावच संयुक्तिक आहे असं मत मांडलं.