Mumbai Landslide: चुनाभट्टी येथे 50 फूट खोलपर्यंत जमीन खचली; जवळपास 40 ते 50 वाहनं खड्ड्यात कोसळली
चुनाभट्टीजवळ रौनक ग्रुपचं बांधकाम सुरु असताना अचानक रस्ता 40 ते 50 फूट खोलपर्यंत खचला. जमीन खचल्याने जवळपास 40 वाहनं खड्ड्यात ढासळल्याचं पाहायला मिळालं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधक्कादायक म्हणजे जवळपास चाळीस दुचाकी आणि एक मोटर कारही या खचलेल्या खड्डयात कोसळल्या आहेत.
ही घटना ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर चुनाभट्टी भागात वसंतदादा पाटील इंजिनियर कॉलेजसमोरील राहुल नगर भागात असलेल्या एसआरए बिल्डिंग समोर घडली आहे.
इथे रौनक ग्रुप विकासकाचे इमारत बांधकामासाठी पायलिंगचे काम काही दिवसांपासून सुरु आहे. रौनक ग्रुपचे काम सुरु असताना अचानक रस्ता 40 ते 50 फूट खोलपर्यंत खचला.
यातच मुंबईत काही दिवसांपासून जोरदार पाऊसही बरसतो आहे. अशात आज सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान या कामाच्या बाजूचा रस्ता हळूहळू खचू लागला.
या रस्त्यावर स्थानिकांच्या चाळीस ते पन्नास दुचाकी उभ्या होत्या, तर एक कार देखील उभी होती. या गाड्या बाजूला काढण्याआधीच काही क्षणात हा रस्ता जवळपास चाळीस फूट खोल खाली खचला.
त्या रस्त्याच्यासोबत या सगळ्या गाड्याही त्या खड्ड्यात कोसळल्या.सुदैवाने ही घटना घडताना सर्व नागरिक सावध झाले आणि परिसरातून दूर झाल्याने जीवितहानी टळली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या दुचाकी बाहेर काढण्यास सुरुवात केली.
तसेच शेजारी असलेल्या राहुल नगर एसआरए प्रकल्पातील रहिवाशांना सतर्क राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.