Tomato : टोमॅटोच्या दरात वाढ, किलोला मिळतोय 100 ते 120 रुपयांचा दर
सध्या देशासह राज्यात देखील टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी वाढ झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्या शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी सध्या टोमॅटो आहेत, त्यांना मोठा फायदा होत आहे.
सद्या नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये टॅामेटोची आवक घटली आहे. त्यामुळं दरात वाढ झाली असून, किलोला 100 ते 120 रुपयांचा दर मिळत आहे.
नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये टॅामेटोची नेहमी 40 ते 60 गाड्यांची आवक होत असते. आज मात्र फक्त 15 ते 20 गाड्यांची आवक बाजार समितीत झाली
होलसेल मार्केटमध्ये दरानं शंभरी गाठल्याने किरकोळ मार्केटमध्ये टॅामेटोचे दर हे 130 ते 150 रुपयापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
देशातील काही भागात टोमॅटोचे दर हे 140 ते 150 रुपये प्रतिकिलोवर गेले आहेत.
सध्या राज्याच्या काही भागातच पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक भागात अद्याप पावसानं हजेरी लावली नाही. त्यामुळं तिथे नवीन टॅामेटोचं उत्पादन नाही. त्यामुळं सध्या बाजारपेठेत टोमॅटोचा पुरवठा कमी आहे.
दक्षिणेतून येणाऱ्या टोमॅटोनं बाजारातील सर्व विक्रम मोडले आहेत. काही ठिकाणी राज्यात टोमॅटोचे दर हे 140 रुपये किलोवर पोहोचलेत