Lalbaugcha Raja Visarjan 2024: लालबागचा राजा तराफ्यावर बसला; चहुबाजूंना जनसागर, बाप्पा निघाला गावाला
गेल्या दहा दिवसांपासून असंख्य गणेशभक्तांनी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती. अखेरच्या दिवशीदेखील लालबागचा राजाला निरोप देण्यासाठी देखील गर्दी उसळली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appढोलताशांचा दणादणाट... फटाक्यांची आतषबाजी...गुलालाची उधळण आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... चा जयघोष करत राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला.
गिरगाव चौपाटीवर दाखल झाल्यानंतर राजाची आरती झाली.
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या बोटींनी विशेष सलामी दिली.
लालबागच्या राजाला दरवर्षीप्रमाणे यंदाही तराफ्यावरुन खोल समुद्रात नेण्यात आलं. खास लालबागच्या राजासाठी हा तराफा बनवण्यात आला आहे.
लालबागचा राजा ज्या तराफ्यावर होता. तो तराफा हळूहळू पाण्याच्या आत गेला
चौपाटीपासून काही अंतरावर आत अरबी समुंद्रात गेल्यावर राजाचं विसर्जन होणार आहे.
हायड्रॉलिक्सचा वापर करत विसर्जन करण्यात येणार आहे.
विसर्जन तराफ्यावर पाच स्कुबा डायव्हर्स आहे.