PHOTO: पालखी निघाली राजाची, गणेश नगरात गर्दी भाविकांची; 'लालबागचा राजा' थाटात विसर्जनासाठी मार्गस्थ
मयूर सिंहासनावर रूढ लालबाग राजाची स्वारी ऐटीत विसर्जनासाठी मार्गस्थ झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतर, आपल्या लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी लालबागमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
राजाची स्वारी लालबाग मार्केटच्या वेशीवर येताच मानाची फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
लालबागचा राजा आता लालबाग नगरीला प्रदक्षिणा घालून भक्तांचा निरोप घेणार आहे.
त्यानंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीच्या दिशेनं मार्गस्थ होणार आहे.
गुलालाची उधळण करत लालबाग राजाची मिरवणूक जल्लोषात मार्गस्थ झाली आहे.
मोठ्या संख्येनं भाविक लाडक्या लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले असून ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरला आहे.
गुलालाची उधळण करत, ढोल-ताशांच्या गजरात भाविक आपल्या लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहेत.
संपूर्ण लालबागमध्ये अनेक पुष्पवृष्टी लालबागच्या राजावर फुलांचा वर्षाव करण्यासाठी सज्ज आहेत.
अकरा दिवस पाहुणचार घेणाऱ्या लाडक्या लालबागच्या राजाला कार्यकर्ते साश्रू नयनांनी निरोप देत असल्याचं पाहायला मिळत आहे.