Lalbaugcha Raja Visarjan 2024: अरे ही शान कोणाची... लालबागचा राजाची! गिरगाव चौपाटीवर मुंगी शिरायलाही जागा नाही
रोहित धामणस्कर
Updated at:
18 Sep 2024 09:59 AM (IST)

1
लालबागचा राजा तब्बल 22 तासांच्या मिरवणुकीनंतर गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी दाखल झाला होता. आरती संपन्न झाल्यावर लालबागचा राजा तराफ्यावर बसवण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
लालबागचा राजाच्या आरतीसाठी गिरगाव चौपाटीवर प्रचंड गर्दी होती. यावेळी चौपाटीवरील वातावरण अक्षरश: भारल्यासारखे झाले होते.

3
लालबागचा राजाला अखेरचा निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.
4
लालबागचा राजाच्या विसर्जनावेळी टिपण्यात आलेले विहंगम दृश्य
5
लालबागचा राजाला पाहण्यासाठी सकाळी गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी पाहायला मिळत होती. यावेळी चहुबाजूंना गर्दीच गर्दी दिसत होती.
6
निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी... लालबागचा राजा विसर्जनसाठी तराफ्यावर बसला. हायड्रॉलिक क्रेनच्या साहाय्याने गणपतीचे खोल समुद्रात विसर्जन केले जाईल.