Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न!
गेल्या वर्षी कोरोना संसर्गामुळं लालबागचा राजा सर्वजनिक गणेशोत्सव मंडळने 'आरोग्य उत्सव' साजरा केला होता. यावर्षी मात्र राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व नियमांचे पालन करून गणेश उत्सव साजरा केला जाणार असल्याचा निर्णय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अशातच आज लालबागच्या राजाचा पाद्यपुजन सोहळा पार पडला. (PHOTO : Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ यंदा आपलं 88 वा गणेशोत्सव सोहळा साजरा करणार आहे. यंदा मंडळातर्फे शुक्रवारी म्हणजेच, 10 सप्टेंबर 2021 ते रविवार 19 सप्टेंबर 2021 या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. (PHOTO : Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal)
आज दिनांक 10 ऑगस्ट रोजी सकाळी ठिक सहा वाजता लालबागच्या राजाचा गणेश मुहूर्त पूजन अर्थात पाद्यपूजन सोहळा अत्यंत मांगल्यमय आणि पावित्र्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला. खऱ्या अर्थानं लालबागच्या राजाच्या या गणेशोत्सवाला आजपासूनच सुरुवात झालेली आहे. (PHOTO : Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal)
कोरोना संसर्ग निर्बंधांमुळे अत्यंत साधेपणाने आणि सुरक्षितपणे हा सोहळा पार पडला. लालबागच्या राज्याच्या दर्शनाला होणारी गर्दी पहाता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं हा सोहळा जाहीरपणे न करता, काही मर्यादित कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केला. (PHOTO : Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal)
दरवर्षी लालबागच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्यालाही गणेशभक्तांची मोठी गर्दी होते. यंदा मात्र कोरोना निर्बंधांमुळे मंडळाने गर्दी टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली होती. (PHOTO : Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal)
यंदा राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व नियमांचे पालन करून गणेश उत्सव साजरा केला जाणार असल्याचा निर्णय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मूर्तीच्या उंचीबाबत जे निर्बंध जे नियम शासनाने घालून दिली आहे त्याचे सुद्धा काटेकोरपणे पालन मंडळाकडून केले जाईल, असं मंडळाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. (PHOTO : Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal)
(PHOTO : Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal)
(PHOTO : Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal)
(PHOTO : Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal)
(PHOTO : Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal)