Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
Lalbaug Accident PHOTO: लालबागची नुपूर हकनाक बळी गेली; मद्यधुंद प्रवाशाच्या मूर्खपणामुळे मणियार कुटुंबाचा एकुलता एक आधार हरपला
कुणाला काहीच कळायला मार्ग नव्हता. अनियंत्रित झालेल्या बेस्ट बसनं एक, दोघांनी नाहीतर तर तब्बल 9 जणांना उडवलं होतं. या अपघातात एका तरुणीनं आपला नाहक जीव गमावला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबेस्टची 66 क्रमांकाची बस राणी लक्ष्मीबाई चौक, सायन येथून बॅलार्ड पिअर इथं जात होती. लालबागमधील गणेश टॉकीज येथे पोहोचल्यावर बसमधून प्रवास करत असलेल्या मद्यधुंद प्रवाशानं गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
प्रवासी फक्त चालकासोबत केवळ गोंधळ घालत नव्हता, तर त्यानं कोणताही मागचा पुढचा विचार न करता, थेट चालकाच्या हातातलं बेस्ट बसचं स्टेअरिंग ओढायला सुरुवात केली.
बस अनियंत्रित झाली आणि थेट गर्दीत घुसली. तब्बल 9 जणांना बसनं उडवलं. त्यापैकी दोन तरुणी गंभीर जखमी झालेल्या. त्यातील एका तरुणीनं जीव गमावला आहे.
लालबागमधील चिंचपोकळीच्या मुक्ताई बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या नुपुरा मनियार या तरुणीचा मृत्यू झाला आहे. यामुळे अवघ्या लालबागवर शोककळा पसरली आहे.
28 वर्षांची नुपूरा गेल्यामुळे मनियार कुटुंबाचा घरातील कर्ता हात गेलाय. नुपूराच्या वडिलांचा कोविडमुळे मृत्यू झाला. वडील गेल्यानंतर घरात नुपूरा, तिची आई आणि तिची लहान बहीण अशा तिघीच राहत होत्या.
वडील गेल्यानंतर नुपूरानं घराची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेतली होती. आपल्या कुटुंबाचा गाडा नुपूरा मोठ्या कष्टानं ओढत होती.
वडील गेल्यानंतर त्यांच्या जागी ती कामात रुजू झाली होती. साधारणतः दोन महिन्यांपूर्वी नुपूरा वडिलांच्या जागी कामाला लागली होती.
वडिलांच्या दुःखातून कुटुंब सावरतंय, तेवढ्यात नुपूरानं जगातून अचानक एग्झिट घेतल्यानं मनियार कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
वडील गेल्यानंतर नुपूरानं कुटुंबाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. पण आता नुपूरच्या जाण्यानं पुन्हा एकदा तिच्या आई आणि बहिणीच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.