बाप्पांच्या आगमनाची लगबग, मद्यपी प्रवाशाची बस चालकासोबत झटापट; लालबागमध्ये 9 लोकांना उडवलं

बाप्पांच्या आगमनाची लगबग सुरू असताना लालबाग येथे रविवारी रात्री बेस्ट प्रवासादरम्यान एका मद्यपीने चालकासोबत वाद घातला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
यावेळी त्याने बसचे स्टेअरिंग वळवल्याने बसने दोन कार, दुचाकी आणि दोन पादचाऱ्यांना धडक दिली.

सदर घटनेत 9 जण जखमी झाले तसेच काही वाहनांचे नुकसान झाले.
सदर याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी मद्यपीला ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस्ट बसचालक कमलेश प्रजापती हे बस घेऊन गरमखडा, लालबाग सिग्नलजवळ पोहोचताच मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दत्ता मुरलीधर शिंदे या प्रवाशाने गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
चालकासोबत वाद करत त्याने बसचे स्टेअरिंग बळजबरीने डाव्या बाजूला वळवले. यावेळी बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बसने दोन कार, दुचाकी आणि दोन पादचाऱ्यांना धडक दिली. तसेच 9 जण जखमी झाले. त्यापैकी दोघांना गंभीर दुखापत झाली आहे.
झटापटीत नियंत्रण सुटले बेस्ट विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बस राणी लक्ष्मी चौकच्या दिशेने जाताना गणेश टॉकीजच्या दरम्यान एका मद्यपी प्रवाशाने बसचालकाबरोबर झटापट केली.
यावेळी बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पदपथावरील काही पादचारी जखमी झाले. याप्रकरणी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.