Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Mumbai Kavad Yatra : श्रावणानिमित्त शिवसेनेची भव्य कावड यात्रा, कुर्ल्यात हजारो भाविकांची हजेरी
कुर्ला : शिवसेना शिंदे गटाच्या वतीने चांदीवलीमध्ये भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रावण मास निमित्त हिंदू संस्कृती आणि परंपरा जोपासण्यासाठी भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं.
भगवान शंकराच्या जयघोषात पाच हजारांपेक्षा जास्त भाविक भगवे वस्त्र परिधान करुन या यात्रेत सहभागी झाले होते.
कुर्ल्याचे छत्रपती शिवाजी महाराज तलाव ते काजूपाडा श्री शंभो महादेव मंदिर पर्यंत ही यात्रा काढण्यात आली.
या कावडयात्रेत हजारो उत्तर भारतीय महिला भगवी साडी परिधान करून सहभागी झाल्या होत्या.
श्री शंभो महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यासाठी महिला डोक्यावर कलश घेतलेल्या दिसत होत्या.
तसेच शेकडो पुरुष हे भगवे कुर्ते परिधान करून कावड घेऊन उपस्थित होते.
आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली ही भव्य कावड यात्रा काढण्यात आली होती. 6
मोठ्यांसह लहान मुलेही कावड यात्रेमध्ये सहभागी झाली होती.
भगवान शंकर, श्रीराम, हनुमान आदी मुर्त्यासह चलतचित्र देखावे ही प्रदर्शित करण्यात आले होते.