Karanj Submarine Photo: पाणबुडी 'आयएनएस करंज' आजपासून नौदलाच्या ताफ्यात दाखल

image 1सायलेंट किलर म्हणून ओळखली जाणारी आयएनएस करंज पाणबुडी आज नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे. मुंबईतील वेस्टर्न कमांडच्या नेव्हल हेडक्वार्टरमध्ये लष्करी परंपरेनुसार करंज पानबुडीला युद्धनौकांमध्ये सामील करण्यात आलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
image 2फ्रान्सच्या मदतीने आयएनएस करंजची माजगाव डॉकयार्डने (एमडीएल) निर्मिती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत स्वदेशी बनावटीच्या सहा पाणबुड्यांची बांधणी मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये करण्यात येते आहे. त्यापैकीच एक असलेली आयएनएस करंज सर्व यशस्वी चाचण्यांनतर आज नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे.

image आयएनएस करंज ही कलावारी क्लासची तिसरी पाणबुडी आहे. करंज पाणबुडी 221 फूट लांब, 40 फूट उंच, खोली 19 फूट, 1565 टन वजनाची आहे. 3
image 4यात मशिनरी सेटअप असा करण्यात आला आहे की सुमारे 11 किमी लांबीची पाईप फिटिंग्ज करण्यात आली आहे. करंज पाणबुडी 45-50 दिवस पाण्यात राहू शकते.
image 5स्टील्थ तंत्रज्ञानाच्या मदतीने ही पानबुडी रडारमध्ये येत नाही. कोणत्याही हवामानात काम करण्यास कंरज सक्षम आहे. या पानबुडीचा टॉप स्पीड 22 नोट्स आहेत.
imag जास्त काळ प्रवासासाठी आयएनएस करंजमध्ये 360 बॅटरी सेल आहेत. प्रत्येक बॅटरी सेलचे वजन सुमारे 750 किलोग्रॅम आहे. त्यात दोन 1250 किलोवॅट डिझेल इंजिन आहेत. या बॅटरीच्या जोरावर आयएनएस करंज 6500 नॉटिकल माईल्स म्हणजे सुमारे 12000 किमी प्रवास करू शकते. आयएनएस करंज 45-50 दिवसांच्या प्रवासाला जाऊ शकते. e 6
image 7 सर्वात महत्त्वाचे म्हणजे मॅग्नेटाइज्ड प्रोपल्शन मोटर, ज्याचे तंत्रज्ञान फ्रान्सकडून घेण्यात आले आहे. यामुळे पानबुडीतून येणारा आवाज बाहेर येत नाही. त्यामुळे शत्रूला या पानबुडीचा शोध घेणे कठीण जाते.