Dahi Handi 2023 : मुंबईत महिला काँग्रेसने फोडली भ्रष्टाचार, महागाईविरोधातील दहीहंडी
देशातील वाढती दडपशाही, महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटना, जातीयवाद, महागाई यांचा विरोध करण्यासाठी मुंबईतील महिला काँग्रेसने एक अनोखा उपक्रम राबवला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोकुळाष्टमीचं औचित्य साधून महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचार, जातीयवाद आणि महागाई यांच्या विरोधातील प्रतिकात्मक दहीहंडी फोडून निषेध केला.
मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष आमदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने मुंबईतील काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर राज्यासह मुंबईतील काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नव्यानेच नियुक्ती झालेल्या आमदार वर्षा गायकवाड यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात विविध कार्यक्रम सुरू केले आहेत.
त्याशिवाय महागाईने देखील उच्चांक गाठला आहे. तसंच देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या संख्येत वाढ झाली आहे. या सर्व कारभाराचा निषेध करण्यासाठी आम्ही ही प्रतिकात्मक दहीहंडी फोडली, असं आमदार वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं.
भ्रष्टाचाराविरोधात रणशिंग फुंकत सत्तेत आलेल्या मोदी सरकारच्या काळातच भ्रष्टाचार फोफावला असल्याचा आरोप मुंबई महिला काँग्रेसने केला.