PHOTO : 'लालबागचा राजा' आणि तोही 10 रुपयांच्या नाण्यावर; गणेश भक्ताची किमया
बाप्पावर असलेली आपली श्रद्धा ही प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं दर्शवत असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयवतमाळमध्ये राहणाऱ्या गणेश भक्तानं 10 रुपयांच्या नाण्यावर गणरायाची प्रतिमा साकारली आहे.
10 रुपयांच्या नाण्यावर यवतमाळमधील एका तरुणीनं 'लालबागच्या राजा'ची हुबेहुब प्रतिमा साकारली आहे.
यवतमाळमध्ये राहणाऱ्या वैष्णवी विनोद कानोजे हिनं ही प्रतिमा रेखाटली आहे.
10 रुपयांच्या नाण्याची आकार फक्त 1 इंचाचा आहे.
एवढ्या लहान नाण्यावर वैष्णवीनं गणरायाची अत्यंत सुबक प्रतिमा रेखाटली आहे.
यासाठी वैष्णवीला तब्बल 48 मिनिटांचा अवधी लागला.
वैष्णवी यवतमाळची रहिवाशी असली तरी तिचं शिक्षण मुंबई आमि नाशिकमध्ये झालं आहे.
त्यामुळे मुंबईचा गणेशोत्सव अनेकदा तिनं जवळून अनुभवला आहे.
गणेशोत्सव म्हणजे, लालबाग. संपूर्ण देशभरातच नवसाला पावणारा म्हणून लालबागच्या राजाची ख्याती आहे.